। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.25) दुपारी 2.30 वाजता कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे आयोजित करण्यात आले आहे. हा सोहळा माजी आ. पंडीत पाटील, आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी शेकापचे खजिनदार राहूल पोकळे, इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे, शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते विलास थोरवे, मध्यवर्ती समितीचे सदस्य काशजी निर्मळ, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेकापच्यावतीने करण्यात आले आहे.