कोर्लई येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत

चोरढा बॉईज प्रथम विजेते
। रेवदंडा । वार्ताहर ।

बोर्ली येथील बबलू व अबू यांचे नियोजनाने कोर्लई येथील मैदानात दि. 13,14,15, व 16 डिसेंबर रोजी आयोजीत टेनिस बॉल मर्यादीत षटकाच्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांचे ह्रस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्पधेतील विजेते प्रथम क्रमांकास रूपये 20 हजार रोख व भव्य ट्राफी, व्दितीय क्रमांकास 15 रूपये रोख व भव्य चषक, तृतीय क्रमांकास 10 हजार रूपये रोख व भव्य चषक, चतुर्थ क्रमांकास रूपये 5 हजार रोख व भव्य चषक, पाचव्या क्रमांकास रूपये 5 हजार रोख व भव्य चषक तसेच मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलदांज यांना चषक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत पंचाचे काम जयेश म्हात्रे तसेच गुणलेखन शादाब पठाण, स्पर्धेचे धावते वर्णन पंकज पाटील, रामकृष्ण पाटील यांनी केले.
कोर्लई येथे आयोजीत टेनिस बॉल मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत चोरढा बॉईज प्रथम विजेते ठरले, तर कमलादेवी पारगाण व्दितीय क्रमांकाचे,कोर्लई फे्रड्स क्लब तृतीय क्रमांकाचे, निरल इलेव्हन आग्राव चतुर्थ क्रमांकाचे व विजय मार्तंंड थेरोंडा पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेचा अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच सनी डोलकर(चोरढा बॉईल्), उत्कृष्ट फलदांज राजा कोटकर (चोरढा बॉईल), व उत्कृष्ट गोलदांज निलेश किंजले (कमलादेवी पारगाण)यांना निवडण्यात आले.या स्पर्धेचे आयोजन बोर्लीचे बबलू व अबू यांनी केले होते.

Exit mobile version