| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चांदई येथे असलेल्या सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे यादवराव तासगावकर शैक्षणिक संकुलावर बँक ऑफ इंडियाकडून जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. 78 कोटींच्या कर्जाचा बोजा तेथील जमिनीवर टाकण्यात आला असून, त्या नोटिसा या शैक्षणिक संकुलाच्या गेटवर चिकटवण्यात आल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील चांधई येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे यादवराव तासगावकर शैक्षणिक संकुलावर घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलाइज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रँचने जप्तीची नोटीस दिली. सरस्वती एज्युकेशन सोसायटीने घेतलेल्या सर्व कर्जाची परतफेड केली नसल्याने त्याविरुद्ध बँक ऑफ महाराष्ट्र कडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तब्बल 78 कोटी 21 लाख 2 हजार 504 रुपयांच्या प्रचंड थकबाकीमुळे थेट कॉलेजच्या मुख्य गेटवर कायदेशीर जप्तीची म्हणजेच पझेशन नोटीस चिटकवून संपूर्ण रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. दि.14 जुलै रोजी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि वसुली करणारे एक मोठे पथक अचानक कॉलेजच्या आवारात दाखल झाले. त्यांनी आत येताच संपूर्ण कॉलेज प्रशासनाला आपल्या ताब्यात घेतले, तसेच या कारवाईची माहिती बाहेर जाऊ नये आणि कोणताही अडथळा येऊ नये म्हणून बँकेच्या पथकाने कॉलेजच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन देखील काढून घेतले.त्यानंतर अनेक तास आतमध्ये कागदपत्रांची कसून चौकशी आणि छाननी सुरू ठेवली. बँकेने लावलेल्या अधिकृत कायदेशीर नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.






