। पालघर । प्रतिनिधी ।
भाईंदर पश्चिमेला उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या ठिकाणी एका पोलीस कर्मचार्याने वाहतूक नियंत्रित करत असताना एका दुचाकी चालकाला विना हेल्मेट तसेच कागदपत्रांची विचारणी केली. याचा राग मनात धरून दुचाकी चालक आणि त्याच्या साथीदाराने त्या पोलीस कर्मचार्यावर हल्ला केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार गणेश ताटे हे भाईंदर पश्चिमेला उड्डाणपुलाजवळील मॅक्सेस मॉल नाका येथे वाहतूक नियंत्रनाचे काम करत होते. त्याच ठिकाणी दुचाकीवरून विना हेल्मेट जात असताना पोपटलाल जैन (69) आणि मयंक जैन (28) यांना अडवण्यात आले. या दोघांनी हवालदाराशी हुज्जत घालून पोलीस गणवेशावरील बक्कल नंबरची नेमप्लेट तोडून हिसकावली आणि शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या दोन्हीही आरोपींच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.