आठ मोटार सायकल केल्या हस्तगत
एल सी बी ची कामगिरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि नेरळ पोलिस ठाणे हद्दीत विविध ठिकाणाहून दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेल्या तब्बल आठ मोटासायकल हस्तगत करण्यात अलिबाग येथील स्थनिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
नेरळ पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 379 हा मोटार सायकल चोरीचा गुन्हा दि.04 जुलै 2022 रोजी दाखल असून सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,रायगड- अलिबाग कडून समांतर तपास चालू होता. सदर तपासाचे दरम्यान CCTV. फुटेज तसेच पो.हवा.प्रतीक सावंत, स्था.गु.अ.शाखा, रायगड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे आरोपित यांचा शोध घेवून संशयीत आरोपी मुकेश गजनन गोतरणे, वय.33, गणेश लक्ष्मण परटोले, वय.23 दोन्ही रा.अंबर्जे ता. शहापूर जिल्हा. ठाणे यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी खालील प्रमाणे 08 मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत या आरोपींविरुद्ध नेरळ पोलिस ठाण्यात सात, कर्जत रेल्वे पोलीस ठाणे असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून 3 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या 2 बुलेट, 2 शाईन, 2 युनिकॉर्न, 1 बजाज प्लॅटिना आणि 1 सुपर स्पेलन्डर आशा 8 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी मुकेश गजनन गोतरणे याच्या विरुद्ध वाशिंद पो.स्टे., जि. ठाणे, शहापूर पो.स्टे.,जि. ठाणे या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, पोलिस हवालदार राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, तसेच सहायक फौजदार देवराम कोरम या पथकाने केली आहे..