कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पत्नी आणि अन्य एका तरुणीवर कोयत्याने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी हरी चव्हाण (वय 37, रा. ओम साई बिल्डिंग, देवदगाव) यांच्या विरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

24 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी हरी चव्हाण याने त्याचे पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले आणि त्यानंतर एका तरुणीच्या घरी जाऊन तिच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार केले. यात ती तरुणीदेखील गंभीर जखमी झाली. या प्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version