अवकाळीने खालापूरसह खोपोली झोडपले

| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं संकट उभं झाल्याने अनेक जण चिंतेत सापडले असता 21 मार्चच्या सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार सुरुवात केल्याने अनेकांची तारांबळ उडाल्याने अनेकांनी अवकाळी पावसापासून बचाव मिळावा याकरिता मोठी धावपळ करित आपल्या साहित्याचा बचाव करण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे पाहायला मिळाले असून अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात केल्याने वीटभट्टी व्यवसाय धोक्यात आल्याने वीटभट्टी व्यवसायिक चिंतेत सापडले आहेत. तर अवकाळी पाऊस पडल्याने उकाड्यापासून खालापूर – खोपोलीकरांना दिलासा दिला असला तरी अनेकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.

खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात सकाळच्या सुमारास पावसाने सुरूवात केल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळ पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचा पाहायला मिळाला असून या अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ उडवल्याने या पावसात अनेकांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Exit mobile version