| पनवेल । वार्ताहर ।
अवकाळी पावसाने पनवेल तालुक्यातील वीटभट्टीमालकांचे आणि शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. हंगाम सुरू असल्याने अनेक ठिकाणी वीटभट्ट्या लावण्यात आल्या आहेत; परंतु अचानक आलेल्या पावसाने रचलेल्या विटांची माती झाली. पनवेल शहरासह तालुक्यात मंगळवारी सकाळी अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी मालक आणि शेतकर्यांना चांगलाच फटका बसला आहे.
सध्या वीटभट्टीचा हंगाम सुरू झाल्याने नव्याने भट्ट्या लावल्या होत्या परंतु अचानक आलेल्या पावसामुळे विटांचा चिखल झाला आहे. दगडी कोळसा, लाकूड, तूस, बॉयलर, काळी माती, जाड माती सर्व काही भिजून खराब झाले आहे; तर शेतकर्यांचा भाजीपालादेखील पावसात भिजल्याने कुजण्याची शक्यता आहे.