। अलिबाग । वार्ताहर ।
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस या शुभदिवशी अलिबागमध्ये स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत यात्रेत हिंदू वेष परिधान करून अनेक जणांनी सहभाग घेतला. ढोलताशाच्या गजरात लोककलेचा आगळावेगळा साज या स्वागत यात्रेत पाहायला मिळाला.

ब्राम्हण आळीतील राम मंदीरापासून या यात्रेची सुरुवात झाली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या स्वागत यात्रेची सांगता झाली. यावेळी माजी. नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी नगरसेवक अनिल चोपडा यांच्यासह अन्य पाहुणे उपस्थित होते.