दरडग्रस्त नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील जोगवाडी येथील दरडग्रस्त नागरिक अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये पावसाळ्यात तळा शहरातील तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जोगवाडी गावात सकाळी साडे आठच्या दरम्यान तळगड किल्ल्यावरून दोन मोठे दगड जोरदार वेगाने खाली कोसळले व यातील एक दगड गणपत रामभाऊ शिंदे यांच्या तर दुसरा दगड सुमित्रा शशिकांत शिंदे यांच्या घरावर येऊन आदलल्याने या दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच यामध्ये बंदिनी मंगेश शिंदे या जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ए. एम.कन शेट्टी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा करून आपत्कालीन आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र अद्याप शासनाकडून अनुदान आलेले नाही. अनुदान प्राप्त झाले की ते लवकरच पीडितांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सदर नुकसानग्रस्त नागरिकांना अद्यापही मदत मिळाली नसल्याने ते नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

Exit mobile version