गोमुख समुद्र किनारा विकासाच्या प्रतीक्षेत

| मुरुड जंजिरा । वार्ताहर ।

रायगडचे दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे मुरुड जंजिरा एकदरा डोंगरापलीकडे समुद्रकाठी वसलेले शंकराचे पवित्र स्थान म्हणजे गोमुख (गायमुख). येथील परिसर इतका सुंदर आहे की, गोमुख समोर विशाल भव्य लाटा असलेला समुद्र, डाव्या बाजूस अभेद्य जंजिरा किल्ला, उजव्या बाजूस पदामदुर्ग किल्ला. काळ्या खडकात डोंगराच्या कपारीत वसलेले हे गोमुख पर्यटकांना अतिशय रमणीय ठिकाण आहे. शंकराचे जागरूक स्थान असल्याने महाराष्ट्रातून येथे अस्थी विसर्जनासाठी लोक येतात. सायंकाळी सूर्यास्तावेळी दगडावर बसून ध्यान धारणा करण्यासाठी अनेक भक्त रोज हजेरी लावतात, अशा विशेष पर्यटन स्थळाला विकासासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

खा. सुनील तटकरे यांनी एकदरा पूल ते गोमुख मार्गे खोरा बंदर रास्ता करून परिसराचे सुशोभीकर करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही. जर तो प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्षात झाला तर मुरुडला दाखवण्यासारखे एक पर्यटन स्थळ होईल. गोमुखावर महाशिवरात्रीला सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी रांगा लागतात. सद्य भक्तांना एकदरा गावातून खराब रस्तावरुन चालत जावे लागते. सुशोभकारांचा प्रस्ताव झाला तर भक्त व पर्यटक आपली गाडी गोमुखावर घेऊन जाऊ शकतात व या निसर्गातील अजुबाचे दर्शन घेऊन शकतात.

मुरुडला उन्हाळी सुटीत आल्यावर खास फोटो शूटसाठी गायमुखावर येते. सायंकाळी सूर्यास्तवेळी आकाश सप्तरंगाच साकारतो. पांढर्‍या शुभ्र लाटा काळ्या खडकावर आदळतात आणि समोर जंजिरा व पदामदुर्ग किल्ला असा सगळे एकत्र असल्याने विविध रंगाचे फोटो मिळतात. मनाला शांतता मिळते अशा ठिकाणाचा विकास झाला पाहिजे.

कस्तुरी सलगरे, पर्यटक
Exit mobile version