| रसायनी । वार्ताहर ।
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी तथा लोकशाही उत्सवा निमित्त राष्ट्र सेवा दल इचलकरंजीच्या स्मिता पाटील कलापथकाच्या वतीने पनवेल तालुक्यातील विविध शाळा, कॉलेज आणि गावांमध्ये पुन्हा गांधी ह्या रिंगण नाट्याचे प्रयोग करून गांधी विचारांचा जागर करण्यात आला.
राष्ट्र सेवा दल ही समाजवादी संघटना आणि 42 च्या चले जाव आंदोलनातील प्रमुख नेते युसुफ मेहेरली यांच्या नावाने काम करणार्या पनवेल तालुक्यातील युसुफ मेहरअली सेंटरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींचे 75 वे स्मृतिदिन आणि लोकशाही उत्सव अंतर्गत येथील भानुबेन प्रवीण शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तारा, मधु-प्रमिला दंडवते संकुल बांधनवाडी, रसायनी तील दादामीया दिवाण उर्दू हायस्कूल आपटा, लाडिवली गाव, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महात्मा गांधी चौक आणि संविधान कट्टा या ठिकाणी पुन्हा गांधी या रिंगण नाट्याचे प्रयोग करण्यात आले. विजया चौहान, संतोष ठाकूर, रत्नाकर भोईर, किफायत अंतुले, बाळकृष्ण सावंत, राजू पाटील, सचिन पाटील, मानसी पाटील, तेजस चव्हाण, रवी पवार, अब्रार मुल्ला, राजेश रसाळ, विजया मांडवकर, उदय गावंड, प्रथमेश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.