। उरण । वार्ताहर ।
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांचा ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ हा कवितासंग्रह नुकताच पर्यावरणदिनी डॉ. श्रीपाल सबनीस, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. याचे वितरण सर्वत्र चालू असतानाच श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान यांनी या काव्यसंग्रहाची दखल घेतली. आणि ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्कार जाहीर केल्याचे कळवण्यात आले आहे.