| पाली | वार्ताहर |
मधूबन हरियाणा येथे होणारी 72 वी अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र पोलीस महिला संघाच्या कर्णधारपदी नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस भार्गवी अमित खाडे यांची निवड झाली आहे. ही नवी मुंबई पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब असून, त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
भार्गवी खाडे या नवी मुंबई येथील वाशी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.2015 च्या बॅचमध्ये त्या पोलीस शिपाई या पदावर रुजू झाल्या. आजवर त्यांनी ठिकठिकाणी झालेल्या कबड्डी स्पर्धेत महिला पोलीस कबड्डी संघासाठी प्रतिनिधित्व केले असून, नवी मुंबई पोलीस दलासाठी अनेक पारितोषिके मिळविली आहेत. अखिल भारतीय पोलीस कबड्डी स्पर्धेकरिता महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत. सुधागड तालुक्यातील रासल गावचे सुपुत्र अमित खाडे यांच्या त्या पत्नी आहेत. अमित खाडे हे देखील नवी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल असून, दोघेही वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.