गुडघ्याच्या दुखापतीने जागतिक कुस्ती स्पर्धेतून बजरंगची माघार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती अजिंक्य स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेला मुकावे लागणार आहे. टोकियो ओलिम्पिक स्पर्धेपूर्वी रशियात झालेल्या स्पर्धेत बजरंग पुनियाच्या उजव्या गुघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीने आता पुन्हा डोकेवर काढलं असून त्याला सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बजरंग पुनियाने दुखापतीची गंभीरता लक्षात घेत चठख केले होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील प्रमुख डॉ. दिनशॉ पदीवाला यांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. जागतिक अजिंक्य कुस्ती स्पर्धा ही नॉर्वेतील ओस्लो येथे 10 ऑक्टोबरपासून आयोजित करण्यात येणार आहे.

Exit mobile version