। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र, या दौर्यातून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला वगळले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने शमी लांबलचक स्पेल टाकण्यासाठी सक्षम नसल्याचा अहवाल दिल्याची महिती आहे. जर शमीला इंग्लंड दौर्यातून वगळण्यात आले तरी त्याच्याऐवजी कुणाला संधी मिळणार, याची चर्चा आता सुरु झाली आहे. शमी सध्या आयपीएलमध्ये 4 षटकांचा स्पेल टाकत आहे. मात्र, इंग्लंडमधील धावपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत. अशावेळी तिथे वेगवान गोलदांजांना मोठा स्पेल्स टाकावा लागू शकतो. त्यामुळे आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही, असे बीसीसीआयच्या सुत्रांनी म्हटले आहे.