शेकाप राष्ट्रवादी चे सरपंच पदासह ६ सदस्य विजयी
शिवसेना आणि शिंदे गटाचा दारुण पराभव
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील चावणी ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी शेकापचे बाळासाहेब आखाडे यांची भरघोस मतांनी विजयी झाले असून त्यांचे 6 सदस्य निवडून आले आहे. या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी शेकाप राष्ट्रवादी यांची आघाडी करून निवडणूका लढविल्या होत्या, अतिशय प्रतिष्टेची असलेल्या चावणी ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली असून तिचा निकाल आज जाहीर झाला आहे.
यावेळी शेकाप राष्ट्रवादीचे बाळासाहेब आखाडे हे सरपंच पदी भरघोस मतांनी निवडून आले तर वार्ड क्रमांक 1 मधून सुखदेव भोसले, संगीता संदीप चिंचावडे, लक्ष्मण घुटे तर वार्ड क्रमांक 2 मधून अनिता वाघमारे आणि वार्ड क्रमांक 3 मधून प्राची पांडुरंग पाटील, उषा गंगाराम वाघमारे हे उमेदवार विजयी झाले.
या सर्व विजयी उमेदवारांचे मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या