बळीराम मोकल यांचे निधन

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील हाशिवरे गावचे रहिवासी बळीराम मोकल यांचे शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी निधन झाले. निधनसमयी ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पंचक्रोशितील विविध क्षेत्रातील मान्यवारांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. कै. बळीराम मोकल यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. कै. बळीराम मोकल यांचे दिवसकार्य मंगळवार, दि. 5 मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत.

Exit mobile version