| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाची नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथे संपन्न झाली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे खजिनदार सुरेश पाटील निरीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकारी मंडळाची एकमताने निवड करण्यात येऊन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळाराम पाटील यांची प्रमुख आश्रयदाते, तर अध्यक्ष म्हणून बळीराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : बळीराम पाटील-पनवेल, कार्याध्यक्ष : सुभाष घासे-खालापूर, उपाध्यक्ष : नंदकुमार म्हात्रे-रोहा, उपाध्यक्ष : भगवान धुळे-कर्जत, खजिनदार : गजानन हातमोडे-पनवेल, सरचिटणीस : मारुती आडकर-खालापूर, सहचिटणीस : प्रमोद भगत-अलिबाग, सहचिटणीस : हिरामण भोईर-पेण, तांत्रिक चिटणीस : राजाराम कुंभार-खालापूर, सदस्य: जयेंद्र भगत-अलिबाग, हरिश्चंद्र शिंदे-पेण, जयराम गवते-पनवेल, दत्तात्रेय पाटील-पेण, रमेश लोभी-कर्जत, हरिष टक्के-रोहा.
बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी, रायगड जिल्ह्यातील कुस्तीगीरांनी नेत्रदीपक खेळ करून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकली याबद्दल सर्व पदकप्राप्त कुस्तीगीरांचे कौतुक करुन यापुढेही कुस्तीगीर संघास आवश्यक ते सहकार्य करीन, असे सांगून जिल्हा संघातील सर्व पदाधिकारी, सदस्यांचे आभार मानले. राज्याचे निरीक्षक सुरेश पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याचे सांगून अशी निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्रात मी प्रथमच पाहिल्याचे सांगत त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारी मंंडळास शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष बळीराम पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुस्तीगीर तयार करण्यासाठी आवश्य प्रयत्न करेन. अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल सर्व कार्यकारी मंडळाचे त्यांनी आभार मानले. या बैठकीचे सूत्रसंचालन रायगड गौरव पुरस्कार प्राप्त सुभाष घासे यांनी केले. तर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर यांनी आभार मानले.