अध्यक्षपदी बाळकृष्ण तेरडे यांची बिनविरोध निवड

| पनवेल | वार्ताहर |

कामोठे वसाहतीमध्ये असलेल्या जवाहर को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी बाळकृष्ण उर्फ रमेश तेरडे यांची बिनविरोध निवड तसेच उपाध्यक्षपदी आशिष बलदोटा, कार्याध्यक्षपदी स्वप्नील गुप्ते तर व्यवस्थापकपदी आर.एस. निकम यांच्यासह 13 जणांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. सदर कार्यकारणी मंडळ हे सन 2024 ते सन 2029 पर्यंत कार्यरत राहणार आहे.

Exit mobile version