। खेड । प्रतिनिधी ।
जागतिक तापमानवाढ ही दिवसेंदिवस धोकादायक पातळी ओलांडत आहे. ही तापमान वाढ रोखायची असेल तर बांबू शेती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन राज्य कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आणि बांबू लागवड आणि प्रक्रीया मुल्यवर्धनाची चळवळ राबविणारे पाशा पटेल यांनी खेड येथे केले. अॅग्रोवन, एसआयएलसी आणि जिओ, लाईफ अॅग्रोटेक इंडिया प्रा.लि.च्या वतीने येथील द.ग.तटकरे सभागृहात आयोजित 17 व्या बांबू संधी, मुल्यवर्धन आणि विपणन या कार्यशाळेत श्री.पटेल बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. प्रसाद लाड यांच्याहस्ते झाले.
यावेळी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोकण बांबू केन डेव्हलपमेंट सेंटर चे संचालक संजीव करपे, बांबू कापड उद्योजक आशिष कासवा, जिओलाईफ अॅग्रीटेक इंडिया प्रा.ली.चे विक्री अधिकारी किरण थोरात, खेड भूमिपूत्र फार्मस प्रोड्युसर कंपनीचे नामदेव निकम यांच्यासह शेकडो शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित होते.जागतिक तापमान वाढ ही दिवसेंदिवस धोकादायक पातळी ओलांडत आहे. ही तापमान वाढ रोखायची असेल तर बांबू शेती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन राज्य कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच बांबू लागवड आणि प्रक्रीया मुल्यवर्धनाची चळवळ राबविणारे पाशा पटेल यांनी खेड येथे केले. अॅग्रोवन, एसआयएलसी आणि जिओ, लाईफ अॅग्रोटेक इंडिया प्रा.लि.च्या वतीने येथील द.ग.तटकरे सभागृहात आयोजित 17 व्या बांबू संधी, मुल्यवर्धन आणि विपणन या कार्यशाळेत पटेल बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. प्रसाद लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोकण बांबू केन डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक संजीव करपे, बांबू कापड उद्योजक आशिष कासवा, जिओलाईफ अॅग्रोटेक इंडिया प्रा.ली.चे विक्री अधिकारी किरण थोरात, फार्मर्स कंपनीचे प्रोड्युसर नामदेव निकम यांच्यासह शेकडो शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित होते.