कोंडेपंचतन येथे बांबू लागवडीचा शुभारंभ

| दिघी | प्रतिनिधी |

कृषी विभागाच्या पुढाकाराने व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील कोंडेपंचतन येथे बांबू लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे यांच्या हस्ते सरस्वती गणपत कदम यांच्या शेतात या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, उपकृषी अधिकारी सयाजी इंगळे, उपकृषी अधिकारी अबोली शेलार, सहाय्यक कृषी अधिकारी पंकज पाटील, कृषीसेवक ए. एस. गावडे , डी.बी. कुंभारकर व अनेक शेतकरी उपस्थित होते. बांबू लागवडीस सध्या चांगली मागणी असून, त्यास दरही समाधानकारक मिळत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने या लागवडीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. मनरेगा अंतर्गत लागवडपूर्व कामे जसे की जमीन साफसफाई, खड्डे खोदणे, रोपे लावणे, गवत काढणे, कुंपण बांधणे, सिंचन व खत व्यवस्थापन यासाठी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. योजनेचा प्रचार व जनजागृतीसाठी विभागाकडून गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत.

Exit mobile version