। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील भालनाका या ठिकाणी बँक ऑफ इंडियाची शाखा उभारण्यात आली आहे. या शाखेचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि.13) मोठ्या उत्साहात पार पडला. बँकेचे झोनल मॅनेजर दिपांविता सहानी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अद्ययावत अशी बँकेची शाखा असून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
यावेळी उप झोनल मॅनेजर बिरेन चटर्जी, भरत सहाय, मानव संसाधन प्रमुख विजय जाधव, भाल येथील बँकेच्या शाखा व्यवस्थापिका मृदूला शिंदे, एसकेव्हीके प्रमुख गणेश शिंदे, विकास म्हेत्रे, अमृत कोंडे तसेच भाल शाखा आणि एसकेव्हीकेचे कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग-मांडवा मार्गावरील भालनाका येथे अद्ययावत सुविधांयुक्त अशी बँकेची शाखा उभारण्यात आली आहे. ग्राहकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी आसन व्यवस्था, बँकेतील ग्राहकांचा पैसे भरण्यासाठी जास्त वेळ जाऊ नये, यासाठी आधुनिक साधन सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. तसेच, पैसे काढण्यासाठीदेखील आधुनिक यंत्राची सोय केली आहे. त्यामध्ये कॅश डिपॉझिट व एटीएम मशीनची व्यवस्था उपलब्ध आहे. पासबुक प्रिटींग मशीनदेखील व्यवस्था केली असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक मृदूला शिंदे यांनी दिली आहे.