। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील शिहू येथील सुवर्णा नथुराम मोकल (40) ही महिला 15 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाली आहे. नागोठण्यातील कोकणे हॉस्पिटलमध्ये कामाला जाते असे सांगून सकाळी घरातून बाहेर पडलेली ही महिला अद्याप घरी परतलेली नाही. या महिलेचा रंग सावळा, चेहरा उभट, मध्यम बांधा, उंची 4 फूट 2 इंच, गळ्यात सोन्याची एक डावली असलेले काळे मंगळसूत्र, अंगात पिवळ्या रंगाचा टॉप व सफेद रंगाची लेगीज, पायात चप्पल आहे. अशा वर्णनाची महिला कुणाला आढळल्यास नागोठणे पोलीस ठाण्यात महिला पोलीस हेड कॉ. संजिता सानप यांच्याशी (9881420515) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.