बाणकोट- बागमंडल्यात कोळंबीचा जॅकपॉट

मुरूड मात्र ठणठणाट
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
बाणकोट -बागमंडला समुद्र खाडीत गेल्या 15 दिवसांपासून कोलंबी मोठ्या प्रमाणात मिळत आहे, मात्र तेथून जवळ असणार्‍या मुरूडच्या समुद्रात मात्र मासळीचा धक्कादायक ठणठणाट आहे. भरपूर दिवसांपासून मुरूड मार्केटमध्ये बाहेरगावहून सुरमई, बांगडे, रावस,कोलंबी अशी मासळी आयात होत आहे. या सर्व मासळीचे दर सामान्यांना परवडत नाही.मुरूड च्या समुद्रात कोलंबी देखील मिळत नसल्याने नौका किनार्‍यावर नांगरून आहेत.

समुद्रात काहीतरी मिळेल या अपेक्षेने मंगळवारी काही मच्चीमार 11नौका घेऊन पदमजलदुर्ग परिसरात मासेमारीस गेले असता त्यांना अचानक काहीशी कोळ ंबी मिळाली.चैती, टायनी य प्रकारातील ही कोलंबी असून प्रत्येक होडीला सुमारे10 ते 12 किलो कोलंबी मिळाल्याचे रोहन निशानदार यांनी सांगितले. कोलंबी चे एक छोटी टोपली( माप) रु400/- किमतीला विकले जात होते.

बाणकोट -बागमंडला समुद्र खाडीत हा प्रकार अपवाद ठरला असून येथे गेल्या 15 दिवसांपासून कोलंबी मोठ्या प्रमाणात मिळत आहे; मात्र तेथून जवळ असणार्‍या मुरूड च्या समुद्रात मात्र मासळीचा धक्कादायक ठणठणाट आहे अशी माहिती रोहन निशानदार एकदरा यांनी दिली. मुरूड एकदरा येथील काही मासळी विक्रेत्या महिला कोळंबी ख्ररेदीसाठी बागमांडला, श्रीवर्धन येथे गेल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुरूडच्या समुद्रात मासळीचा दुष्काळ पडला असून आयात मासळीवरच मदार दिसून येत आहे.तरीही खूप दिवसांनी थोडीबहुत का होईना मुरूड ची ताजी कोलंबी खवय्यांना बुधवारी खायला मिळाली.समुद्रात मानवाकडून केल्या जाणार्‍या धोकादायक घडामोडी मुळे येथील मासळीने स्थलांतर केल्याची माहीती निशानदार यांनी दिली असून त्या मुळेच असे प्रकार होत आहेत असे स्पष्ट केले

Exit mobile version