बसचालकाला मारहाण

| पनवेल | वार्ताहर ।

बसचा धक्का लागून खाली पडलेल्या इसमाने बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि दरवाजाची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णू शेषराव भोसले हे ठाणे ते चिपळूण ही शिवशाही बस घेऊन चिपळूणला पोहोचले. ते 31 मार्च रोजी ब्रेकडाऊन झाल्याने चिपळूण येथून माणगाव या ठिकाणी आले. 1 एप्रिल रोजी बस व्यवस्थित झाल्याने माणगाव बस डेपो येथून प्रवासी घेऊन पनवेल येथे दुपारी पावणेतीनच्या सुमारास सोसायटी नाका, गांधी हॉस्पिटल समोर आले. यावेळी धीम्या गतीने गर्दीमध्ये असताना एक मोटारसायकलस्वार डाव्या बाजूने बसला ओव्हरटेक करत असताना बसचा हलकासा धक्का लागला व त्याची मोटारसायकल खाली पडली. यावेळी त्यांनी बस जागेवर थांबवली. त्यानंतर मोटारसायकल चालकाने हाताने बसच्या ड्रायव्हर बाजूच्या दरवाजाची काच फोडली व चालकाच्या कपाळावर जोरात ठोश्या मारला.

Exit mobile version