खालापूर पोलीस, गोरक्षकांची धडक कारवाई
। खोपोली । प्रतिनिधी ।
शिर्डी श्रीरामपुरवरून मुंबईकडे एक्सप्रेसवरून अंदाजे 900 किलो वजनाचा गोमांस घेऊन जाणारी स्कार्पिओ कार गोररक्षकांच्या मदतीने खालापूर पोलिसांनी पकडली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.28) पहाटेच्या दरम्यान केली. गोमांस तस्क्रीच्या घटनेने सर्व संताप व्यक्त होत असताना खालापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी श्रीरामपुरवरून रात्री 2 वाजता मुंबईकडे गोमांस घेऊन निघाल्याची माहिती पोलिसांना माहीती मिळाली. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांच्या मदतीने सावरोली टोल नाक्यावर सापळा रचनाण्यात आला होता. पहाटे 6 वाजता गोमांस घेऊन जाणारी आलिशान स्कार्पिओच्या मागोमाग गोरक्षक व विश्व हिंदू परिषदेचे सुनील पाटील सचिन पाताळे व गोरक्षक यांनी खालापूर टोल नाक्यावर आल्यावर ही गाडी थांबवली. खालापूर पोलिसांच्या मदतीने गोवन सुरक्षा समिती खालापूर यांच्यासमोर गाडीची तपासणी केली असता यात जवळपास अंदाजे 900 किलो गुरांचे मास आढळून आले.
त्यामुळे तात्काळ खालापूर पोलिसांनी ही स्कार्पिओ ( एम.एच.55 बी.7555) व त्यातील दोन जणांना खालापूर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी सुरू केली. चौकशीत हे गोमास शिर्डी श्रीरामपूर येथून रात्रीच्या दरम्यान एक्सप्रेस वेमार्गे गोवंडी मुंबईकडे घेऊन निघालो असल्याचे कबूल केले. तर सुलेमान कुरेशी हा मुख्य टोळी प्रमुख असल्याची माहिती दिली. याप्रकरणी स्कार्पिओ कारसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या घटनेमुळे खालापूर तालुक्यात तीव्र निषेधाची भावना व्यक्त होत आहे. गुरांचे मास खालापूर पोलिसांनी दफन केले असल्याची माहिती खालापूर पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे. या कारवाई गोरक्षक सुनील पाटील, सचिन पताळे आणि गोवंश सुरक्षा समिती खालापूर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.







