रमजानच्या रोजाना प्रारंभ

। माणगाव । प्रतिनिधी ।
इस्लाम धर्मियांच्या शाबान महिन्यानंतर पवित्र अशा रमजान महिन्याला सुरुवात होते.या पवित्र रमजान महिन्याला शनिवार दि.2 एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर प्रारंभ झाला असून रविवार दि.3 एप्रिलपासून महिनाभर मुस्लिम बांधवांचे रमजानचे रोजे(उपवास) सुरु झाले आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे लवकर उठून थोडे फार काहीतरी जेवण,नाश्ता करून पहाटेच्या नमाजी अगोदर होणार्‍या बांगीच्या पहिले दिवसभर कडक रोजा धरीत असतात.अन्न व पाण्याविना हा रोजा मुस्लिम बांधव दिवसभर कडक असा धरीत असतात.हा रोजा सायंकाळी मगरीब नमाजीच्या बांगीबरोबर दिलेल्या वेळेत सोडला जातो.यानंतर रात्री ईशाची नमाज झाल्यावर तराविहची सामुदायिक विशेष नमाज मुस्लिम बांधव अदा करतात. या महिन्यात मुस्लिम बांधवांचा दानधर्म करणे म्हणजेच गोरगरीब लोकांना जकात देणे,नमाज,रोजा व कुरआन पठण करणे यावर विशेष भर असतो.

Exit mobile version