। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचे शहर असूनही याठिकाणी आजवर अपेक्षित विकास घडलेला नाही. त्यामागील एक मुख्य कारण म्हणजे प्रशासनाने आखून ठेवलेली ‘पुररेषा’ हे आहे. ही पुररेषा नद्यांच्या आसपासच्या भागात कोणतीही बांधकामे होऊ नयेत यासाठी आखली जाते. मात्र, माणगावच्या संदर्भात ती वास्तविकतेपेक्षा जास्त व्यापकरी आणि कठोरपणे लावली गेल्याचे स्थानिक उद्योजक आणि नागरिकांचे म्हणणे आहे. माणगाव परिसरात काळ व गोद नदीचा प्रवाह आहे. या नदीच्या आजूबाजूचा बराच मोठा भाग पुराच्या धोक्याच्या क्षेत्रात मोडतो, असे मानले जाते. त्यामुळे या भागात कोणतीही नवीन बांधकाम परवानगी सहज मिळत नाही. परिणामी, उद्योग, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था, गृहनिर्माण प्रकल्प अशा अनेक विकास कामांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक व उद्योजकांनी ग्रह प्रकल्प उभारणीकडे पाठच फिरवली आहे.