‘गुरेचोरांपासून सतर्क राहा’

। सुतारवाडी । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर दिवसा आणि रात्री अनेक उनाड गुरं, मोठ्या टोळक्यानं विश्रांती घेत असतात. अनेक दिवसांपासून गुरं कोठे ही निर्जलस्थळीसुद्धा मोकाटपणे संचार करत असतात. याचाच फायदा आता गुरं चोरणार्‍या टोळक्या घेत आहेत. ही माणसे रात्री टेम्पो घेऊन येतात आणि गुरांचा टोळका दिसला की त्यांना इंजक्शन देऊन बेशुद्ध करुन टेम्पोमध्ये भरुन विक्रीसाठी नेतात. गुरे मालकांनी सतर्क राहून आपली गुरं कोठेही मोकाटपणे भरकटणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण सध्या गुरं चोरणार्‍या टोळ्या सतर्क असल्याचे पाहवयास मिळत आहे.

Exit mobile version