| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आयुष्य वेचणारे स्व. नारायण नागू पाटील यांचा विचारांचा वारसा आजही जयंत पाटील समर्थपणे पुढे नेत आहेत. लहानपणापासून स्व. प्रभाकर पाटील आणि स्व. दत्ता पाटील यांचे समाजकारण आणि राजकारण जवळून पाहण्याचे भाग्य लाभले. त्याच संस्कारांची तिसरी पिढी म्हणून जयंत पाटील यांनी विकासाला नवी दिशा दिली, असे गौरवोद्गार ॲड. गौतम पाटील यांनी काढले. भाईंनी केवळ राजकारण केले नाही, तर सहकार, शिक्षण, पत्रकारिता आणि रोजगारनिर्मितीची मोठी चळवळ उभी केली. त्यांनी लावलेली छोटी रोपे आज वटवृक्ष बनली आहेत. हजारो कुटुंबांच्या आयुष्याला त्यांनी आधार दिला. रायगडच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा पोहोचवून गोरगरीबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक संस्था सक्षम झाल्या आणि हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळाली. विकासाचा विचार केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व म्हणजे जयंत पाटील, असेही पाटील म्हणाले.
भाई म्हणजे दूरदृष्टी, विकास आणि माणुसकीचा संगम: ॲड. गौतम पाटील
