गोरेगावचा भैरवनाथ यात्रोत्सोव ४ एप्रिलला

| माणगाव | प्रतिनिधी |
गोरेगाव येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सोव 4 एप्रिलला साजरा होणार आहे.यात्रा उत्सवाच्या अध्यक्ष पदी पत्रकार भारत गोरेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उत्सवात हिंदु मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे. लाट सोमवारी 3 एप्रिल 23 रोजी मांघरूल गावातून आणण्यात येणार असून मंगळवारी 4 एप्रिलला यात्रात्सोव संपन्न होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर वतनदार मंडळी, देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांनी विनायक महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत यात्रा उत्सवाचे नियोजन करण्यात आले भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता गैरसोय होणार नाही यावरती उपाय योजना करण्यात आल्या तसेच यावर्षीची यात्रात्सोव समिती नेमण्यात आली यामध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून किशोर तटकरे, अशोक आंबेतकर, उमेश लाड, संजय पोवळे, संतोष महाडीक, निलेश महाले, विशाल भुस्कुटे, आशितोष महाले, रूपेश पितळे, अभिजित महाले, सचिन गोरेगावकर यांची निवड करण्यात आली.

बैठकीसाठी सुरेश लाड, दादा महाले, दिलीप गोरेगावकर, आबा पोवळे, गणेश यादव, किरण तांबडे,नाना महाले, हरेश शेठ, गणेश गोरेगावकर, दिलीप भिसे, राकेश पोवळे ,प्रसाद गोरेगावकर आदी उपस्थित होते. या यात्रेत कुरवडे येथील मानाची काठी एकादशीला येते, यानंतर भैरवनाथ महाराजांची बहिण सोमजाई देवीची पालखी व काठी तसेच मानाची काठी अशी ओळख असलेली भिन्नाड गावची काठी हे भाविकांचे खास आकर्षण असते.

Exit mobile version