| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ, शेलू, दामत, उमरोली, किरवली, चिंचवली, माणगाव तर्फे वरेडी, हालीवली आणि उक्रुळ, या नऊ ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या सर्व कामांचे भूमिपूजन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.
चव्हाण यांच्या माध्यमातून आणि भाजपचे युवक कार्यकर्ते किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्यामळे कर्जत तालुक्यात साधारण 80 कोटींची विकास कामे मंजूर झाली आहे. आर्थ संकल्पात मंजूर झालेल्या कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये रस्ते, समाजमंदिरे आदी कामांचा समावेश आहे.
कर्जत तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन
