तांबाटीमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. महिला सक्षमीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय व चर्चा करण्यासाठी स्वतंत्र महिला सभागृह तयार करून त्याचा लोकार्पण करण्यात आले.

या निमित्ताने महिलांना हळदीकुंकू व पैठणी साडीचा खेळ आयोजित करण्यात आल्याने शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी माजी आ. सुरेश लाड , पदमा पाटील, शरद कदम,,संतोष बैलमारे, संदेश पाटील, अजित सावंत सुरेश पाटील,सरपंच अनिल जाधव, उपसरपंच जगदीश आवास्कर, ग्रामसेवक प्रशांत कदम जितेंद्र दळवी, सारिका लाड,शीतल पाटील, स्नेहल गायकवाड,मेघा पाटील,संगीता मेंगाल, अनिता चव्हाण निकेश जाधव,विठ्ठल वाघ, नितीन कदम ,मनसेचे आशिष कोंडे, सुरेश बलकवडे ,संगम जाधव,प्रशांत आमले हरेश चव्हाण, शैला भगत, श्‍वेता मनवे, सुजाता दळवी यासह विविध ग्राम पंचयतीचे सरपंच सदस्य मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version