। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील निडी तर्फे अष्टमी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नवीन नळपाणी योजनेचे भूमिपूजन माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि.19) सायंकाळी 4 वाजता सिद्धिविनायक गणेश मंदिर निडी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजिप अर्थ व बांधकाम सभापती निलिमा पाटील असणार आहेत. या कार्यक्रमात रोहा पंचायत समिती सभापती गुलाब वाघमारे, सरपंच स्वामिनी डोलकर, शेकाप तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा बँकेचे संचालक गणेश मढवी यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शेकापचे रोहा तालुका खजिनदार परशुराम वाघमारे यांनी दिली.