गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट

चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने जपली बांधिलकी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शाळेचा प्रवास सुकर व्हावा आणि गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण सायकलअभावी अडू नये, या उद्देशाने चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने चरी येथे 107 हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. चरीच्या ऐतिहासिक संपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. चरी ग्रामपंचायत हद्दीतील पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांची कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन ही मदत करण्यात आली. चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचा प्रवास अधिक सुकर व्हावा आणि सायकलअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. यावेळी चरी, कोपर, कोपरपाडा, रायंदे आदी गावांतील ग्रामस्थ, महिला, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version