| पनवेल | वार्ताहर |
खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ उभी केलेली मोटरसायकल चोरून नेल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोप्रोली येथे राहणारे गणेश शिंदे यांनी आपली दुचाकी दि.बा. पाटील रिक्षा स्टॅण्ड येथील खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ उभी केली होती. कामावरून परतल्यानंतर त्यांना आपली दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा खांदेश्वर, मानसरोवर व पनवेल परिसरात शोध घेतला. मात्र, ती सापडून आली नाही. याप्रकरणी त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली