| उत्तर प्रदेश | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभी मेळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागली आहे. आगीमध्ये अनेक तंबू, साहित्य जळून खाक झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महाकुंभच्या सेक्टर -19 मध्ये ही आग लागली. महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी असलेल्या लोखंडाच्या पूलाच्या खाली असलेल्या तंबूंना ही आग लागली आहे. आग लागल्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे. परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. पूलाच्या खाली आग लागल्यामुळे पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. ही आग वाढतच चालली आहे. या आगीमागचे कारण अद्याप समोर आले नाही.