मोठी बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गिकेवरील ‘या’ टप्प्यातील वाहतूक बंद

तब्बल सात तासांचा मेगाब्लॉक

। मुंबई । वृत्तसंस्था ।

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गिकेवरुन आज मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चिखले ब्रिज येथील कामामुळं मुंबई मार्गिका सात तास बंद राहणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी 07.560 (चिखले ब्रिज) येथे आज (दि.9) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत करण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणाऱ्या वरील नियोजित कामाचे वेळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे.

पर्यायी मार्ग कोणते..
1. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने मुंबई लेन किमी 9.600 पनवेल एक्झिट वरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळविण्यात येतील.
2. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
3. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने किमी 39.800 खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येतील.

दरम्यान, प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर वाहतूक बंद असल्यानं मनस्ताप होऊ नये यासाठी वाहनधारकांनी मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीतील बदलांबद्दल माहिती घेतल्यानंतर घराबाहेर पडणं आवश्यक आहे. दिवाळी असल्यानं गावी जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी असल्यानं वाहनधारकांनी प्रशासनानं वाहतुकीबाबत केलेले बदल लक्षात घेऊन प्रवासाचं नियोजन केल्यास त्यांना मनस्ताप होणार नाही.

Exit mobile version