। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची निवड शुक्रवारी (दि.23) करण्यात आली. या निवडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सत्यविजय पाटील यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
अलिबाग तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदासाठी सत्यविजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. अर्ज छाननीमध्ये त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सत्यविजय पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असून ते गेल्या अनेक वर्षांपासून खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सत्यविजय पाटील यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने त्यांनी शेकापसह जयंत पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच, सत्यविजय पाटील यांच्यासह अभिजीत वाळंज, तुळशीराम कोळी, निलेश खोत, प्रमोद नवखारकर, प्रशांत फुलगांवकर, उदय वेळे, अभिजीत साखळे, अरुणा पाटील, संगिता वारंगे, विलास वालेकर, प्रफुल्ल पाटील व दिलीप पेढवी यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रशांत फुलगांवकर, निलेश खोत, प्रफुल्ल पाटील, अरुणा पाटील, संगिता वारंगे, विलास वालेकर, दिलीप पेढवी, प्रमोद नवखारकर, अनिल गोमा पाटील, सिद्धनाथ पाटील, निशीकांत मोकल, डॉ. मनोज पाटील, मनोहर पाटील, तानाजी पाटील, कमळाकर पाटील, प्रदिप पाटील, विक्रम पाटील, प्रसाद पाटील, सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यविजय पाटील यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असहेत.