| कोर्लई | प्रतिनिधी |
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुरुड तालुक्यातील मुरुड ते राजपुरी रस्त्यावर डोंगरी ते राजपुरीदरम्यान डोंगरावरून भला मोठा दगड रस्त्यावर पडला. सुदैवाने जीवित व वित्तहानी झाली नाही.
या रस्त्यावर यापूर्वीदेखील डोंगरावरुन रस्त्यावर दगड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी या रस्त्यावर पर्यटकांची वर्दळ असते. नुकत्याच स्वातंत्र्यदिन, गोकुळाष्टमी, शुक्रवार, शनिवार, रविवार अशी सलग सुट्टी आल्याने तीन दिवस रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांची रेलचेल होती. राजपुरी रस्त्यावर मोठा दगड पडला असल्याचे समजताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट रोशन पाटील यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या सहाय्याने दगड हटविण्यात येऊन वाहतूक पुर्ववत करण्यात आली आहे.
राजपुरी रस्त्यावर मोठा दगड
