। पनवेल । वार्ताहर ।
शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक थंब पध्दत कर्मचार्यांना अनिवार्य असताना पनवेल तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना या पध्दतीमधून वगळण्यात आले आहे का? याबाबत शिवसेना ठाकरे गटाने खुलासा करण्याची मागणी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी म्हटले आहे की, कर्मचारी हे ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, याचा खुलासा होणे प्रथमतः आवश्यक आहे, तसेच तहसीलदार वगळता इतर सर्व कर्मचारी वर्ग 2 व 3 मध्ये अंतर्भूत होतात, त्यामुळे हजेरी लावण्यासाठी किती वाजता हजर राहावे व किती वाजता कार्यालय सोडावे याबाबत बायोमेट्रिक थंब कर्मचार्यांना अनिवार्य आहे.