बिर्लामंदीर रस्त्यावरील खड्डे भरले

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील साळाव-रोहा रस्त्यावरील साळाव ते बिर्लामंदीर रस्त्यावर अतिवृष्टी व पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन खड्डे बुजविण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे या रस्त्याची पार दुरवस्था होऊन जागोजागी खाचखळगे व खड्डे पडले होते. यामुळे वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वाहनचालक व प्रवासी वर्गातून उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. याची सार्वजनिक बांधकाम उपविभागाने तातडीने दखल घेऊन साळाव-बिर्लामंदीर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version