| अलिबाग | प्रतिनिधी |
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्रीपंत वाड्मयाचे गाढे अभ्यासक स्व प्रभाकर पाटील यांचे निकटवर्तीय सखाराम पवार यांचा 90 वा वाढदिवस खडताळ पूल, वरसोली येथील हॉरिझोन सभागृहात साजरा करण्यात आला होता. याप्रसंगी गंधार म्हात्रे यांच्या गायनाचा आणि श्रीधर पाटील यांच्या वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पवार कुटुंबिय आणि किंजवडेकर कुटुंबियातर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सखाराम पवार यांनी 91 व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या पत्नी सौ. सुनंदा, मुले उदय, उमेश, संतोष, कन्या उज्ज्वला किंजवडेकर, सुना, नातवंडे, पतवंडे यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.
पवार यांचे वाढदिवस अभीष्टचिंतन करण्यासाठी अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल चोपडा, ऍड. प्रवीण ठाकूर, उदय जोशी, उमाजी केळुसकर, नागेश कुळकर्णी, मंदार कुळकर्णी, उल्हास पवार, विकास पाटील, सात्विक पाटील, शरद कोरडे, चारुशीला कोरडे, बळवंत वालेकर, हेमकांत सोनार, नंदू तळकर, जगदीश नागे, ऍड. राजेंद्र जैन, विनोद टेंबुलकर, मुश्ताक घट्टे, भालचंद्र वर्तक, आर.के. घरत, श्रीरंग घरत, प्रकाश नागू म्हात्रे, मोहन मनचुके, जी.सी. पाटील, सुरेश पाटील, प्रा. अनिल बांगर आदी उपस्थित होते.