| माणगाव | प्रतिनिधी |
विष्णुदास बुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र यांच्या पुढाकाराने आशाएँ चॅरिटेबल ट्रस्ट, नाकोडा दरबार (मंडळ) लालबाग, वर्धमान संस्कृती सेवाधाम, कोलाबा रोटी बँक, कोलाबा चौविहार हाऊस तसेच श्री पार्श्व वेनेजियन मानव सेवा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने चांदेवाडी येथे गरजू व गरिब कुटुंबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण 130 लाभार्थी कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबांना उब मिळावी आणि त्यांना आधार मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ब्लँकेट देऊन त्यांना मदतीचा हात देण्यात आला. विष्णुदास बुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. संस्थेचे पदाधिकारी गोखले दाम्पत्य,स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक कार्याबद्दल लाभार्थ्यांनी आयोजक संस्थांचे आभार व्यक्त केले. गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून, चांदेवाडी परिसरातील गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक ठरला आहे.







