। कोलाड । वार्ताहर ।
जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासी वाडी येथील विद्यार्थ्यांना अलंकार खांडेकर यांच्या सौजन्याने व कोलाड लायन्स क्लबच्यावतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले.
कोलाड लायन्स क्लबचे बोर्ड ऑफ डायरेक्टर अलंकार खांडेकर यांच्या विशेष सौज्यन्यातून संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप, माजी अध्यक्ष नरेश बिरगावले, अध्यक्ष डॉ. मंगेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड लायन्स क्लबच्यावतीने येथील विद्यार्थी वर्गाला थंडीच्या दिवसांत या उबदार पांघरूणाचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. श्यामभाऊ लोखंडे, रविंद्र लोखंडे, राजेंदर कप्पु, नंदकुमार कळमकर, दिलिप मोहिते, वैशाली सलागरे, मारोतराव कोरडे, शिक्षिका शोभा खांडेकर, पांडुरंग गोसावी, महादेव जाधव, संजना जाधव आदी उपस्थित होते.