। नेरळ । प्रतिनिधी ।
वारकरी संप्रदाय हे कोणत्याही व्यक्तीला समाजात ताठ मानेने जगण्याची ऊर्जा देत असते. त्यामुळे या काळात प्रामुख्याने तरुणांनी वारकरी सांप्रदायाकडे वळावे, असे आवाहन कैलाश भोईर यांनी केले. तालुक्यातील फराट पाडा येथे आयोजित अखंड नामयज्ञ सोहळ्यात काल्याचे कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. कळंब वांगणी रस्त्यावरील फराट पाडा येथील श्रीराम ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून अखंड नामयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी दीपोत्सवनिमित्त शीतल साबळे यांनी हरिकिर्तन सादर केले. काल्याचे कीर्तन कैलाश भोईर यांनी केले. नितीन मंगळ फराट यांनी बहरीनाम सप्ताह फराटपाडा गावात सुरू केला. संभाजी अनंता कडव, जगदीश सिंग (पापाजी) आणि कैलाश भोईर यांनी हा सप्ताह सुरू करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.