कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान

| कर्जत | वार्ताहर |

कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व मेकेनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनच्यावतीने समर्पण रक्तपेढी घाटकोपर- मुंबई यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आयोजित केलेले हे 492 वे रक्तदान शिबिर होते.

शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पिलेवान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राजाभाऊ कोठारी, डॉ. फातेमा कर्जतवाला प्रा. दीपाली केसकर, प्रा. शब्बीर कर्जतवाला, डॉ. ए.जी. नागपुरे, प्रा. प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते. मंगेश वझरेकर, अनिल घरत, वाहिद शेख, तुषार मुंडे व प्रा. विकास पाटील यांनी रक्तदान केले.

याप्रसंगी विकास चित्ते, प्रा. सोनल पाटील, प्रा. आशुतोष जाधव, प्रा. एस.वी. देशपांडे , प्रा. प्रवीण नेरपागर, प्रा. दिनेश तारे, सिद्धेश दातखिळे, प्रियांका सूर्यवंशी, रोहन भोसले, ऋतिक आव्हाड, हृषिकेश जाधव, विश्‍वास अल्हाट, धनश्री कोर, आदित्य गायकर, वैभवी भोंडवे, साक्षी बोरसे, चिन्मय निकम, शार्दुल टेमकर, संदीप लाड, आमिर मणियार, बिलाल आढाल, राकेश परमार, भूषण बाफना आदी उपस्थित होते.

Exit mobile version