श्रीगाव येथे रक्तदान शिबिर

। भाकरवड । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे सचिन साळुंखे प्रतिष्ठान यांच्या उपस्थितीत वाढदिवानिमित्त बुधवारी (दि.24) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 49 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

या रक्तदान शिबिरासाठी राजेश अत्तरबे, रेहाना, श्रद्धा, त्रिवेणी पठाण, निकिता, अतुल गाढवे, वीरा गावडे, संदीप पाटील, हर्षल पवार, अभय तुपे, सुषमा, शुभम पाटील, निलेश पाटील, अवंतिका म्हात्रे, दीपक मोहिते, अतिष मोहिते, किरण मोहिते, अ‍ॅड. शशीकांत जाधव, सारिका साळुंखे, दिपांकी जाधव, नाथा साळुंखे, मिनानाथ पाटील, सुरेश पाटील, रामकृष्ण म्हात्रे, मोरेश्‍वर पाटील, अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version