कच्छ युवक संघाच्या वतीने रक्तदान शिबीर

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. 15 ऑगस्ट रोजी कच्छ युवक संघ अलिबाग शाखा एंकरवाला महारक्तदान अभियानाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन कच्छी भवन, अलिबाग येथे करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदात्यांना आयोजकांकडून भेटवस्तू देण्यात आली. सामाजिक उपक्रमात सातत्याने अग्रभागी असल्याचे कच्छ युवक संघाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी अलिबाग, प्रशांत नाईक मित्र मंडळ, प्रफुल्ल एजन्सी, के.के. एजन्सी व कृषीवलचेही त्यांनी आभार मानले.

Exit mobile version